Breaking News

शेवगावकरचा दणका मोडला शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या D.K. फायनान्स चा मणका

शेवगांवच्या दिलीप भिमराज केसभट याने D. K. इनव्हेसमेंट नावाने बोगस स्कीम (MLM) चालवुन केली शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक

अविनाश देशमुख शेवगांव  9960051755

शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील केसबट वस्ती येथे शेअर मार्केट च्या नावाखाली दिलीप भिमराज केसभट याने D.K. इनव्हेसमेंट या नावाने कंपनी चालु केली होती. याने मला सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर ८%, १२ महिन्याच्या गुंतवणुकीवर १०%, ३ वर्षाच्या गुंतवणुकीवर १५% प्रतिमहिना परतावा देण्याचे अमिष दिले होते. तर तो D.K. इनव्हेसमेंट हया कंपनीच्या नावे खालील बँक खात्याचा पैसे घेत होता. Bank of Baroda A/c – 42108100007854 ifsc BARB0SHEVGA, Phone pay 9834287458 आम्ही माहिती काढली असता D. K. इनव्हेसमेंट ही कंपनी कोठेही रजिस्टर नाही. मी माझ्या घरावर कर्ज २७०७८०० रूपये कर्ज काढुन त्याला पैसे दिले होते. त्याचे पुरावे मी अर्जासोबत जोडले आहेत.

त्याला २५ लाख रूपये दिले होते. दि. २९/०९/२०२४ त्याला ५ लाख ३० हजार रूपये RTGS केले होते. त्याचा पुरावा अर्जासोबत जोडला आहे व १२ / ०१ / २०२४ रोजी निलेश केसभट याने खात्यावरून १२ लाख रूपये काढुन त्याच्या खात्यावर १० लाख रूपये भरले होते. त्याचा पुरावा अर्जा सोबत जोडला आहे व त्याला १० लाख रूपये रोख रक्कम दिली होती. त्याने त्याच्या बदल्यात २५ लाख रूपयाचा चेक दिलेला आहे.त्याने निलेश केसभट याला बँक ऑफ बडोदा ‘००००३४’ “४१४०१२५१००७८५४ ३९ या नंबर चा चेक दिला होता. अशा प्रकारे तो माझी २५ लाख रूपयाची फसवणुक करून ३ महिन्यापुर्वी पसार झाला आहे. तरी आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कर्ज काढल्याचा पुरावा बँक ऑफ बडोदा चा चेक RTGS केल्याचा पुरावा सादर केला आहे अर्जाच्या प्रति मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, मुंबई महाराष्ट्र राज्य पोलीस अधिक्षक,अहमदनगर पोलीस निरीक्षक, शेवगाव पोलीस ठाणे यांना सादर केल्या आहेत.

*ताजा कलम*

*शेअर मार्केटचे बिळामध्ये अजून बरीच उंदर लपून बसले आहेत ती बिळातून बाहेर येण्याची वाट त्यांचे गुंतवणूकदार पाहत आहेत अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पडण्यासाठी वेळ लागणार नाही काही गुतंवणूकदार अजूनही “चल पुढल्या वढ्यात” ला बळी पडत आहेत त्यांना कोण सांगणार त्यांचे पैसे हरणाच्या शिंगाला बांधलेले आहेत ते हरण यांच्या वस्तीवर केव्हा येणार देवच जाणे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved