Breaking News

चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन तर्फे चिमूर कोलारा मार्गावरील धोकादायक काटेरी वृक्षांची केली छाटणी

युवकांनी पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम राबविला

अनेकांची झाली होती काटेरी झाडांमुळे अपघात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमूर तालुक्यात चिमूर ते कोलारा जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला खूप मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे पसरली होती रात्रोच्या अंधारात येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता सायकल व दुचाकीस्वारांना या झाडांचे काटे रुतून अपघात सुद्धा याच मार्गावर झाले असून याकडे कुणीही लक्ष दिले नाही. याची माहिती चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन ला मिळचाच या युवकांनी पुढाकार घेऊन काटेरी झाडांची केली छाटणी.

आज दिनांक.३०/०७/२०२४ गोरगरिबांच्या मदतीस नेहमी एका हाकेवर २४ तास तत्पर राहणारा एकमेव चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आहे. कुठे घडलेला अपघात असो अथवा जनतेच्या रास्त मागण्या यांना वाचा फोडण्याचे काम , झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्याचे काम , या फाऊंडेशन तर्फे केले जात असून चिमूर शहरातील स्थानिकांकडून चिमूर वरून जाणाऱ्या मासळ कोलारा मार्गावर काटेरी वृक्षाच्या फांद्या या रोडवर आल्याने यामुळे नेहमी दुचाकी चे अपघात होत आहे.

अशी माहिती मिळाली असता चिमूर कोलारा मार्गावरील धोकादायक काटेरी वृक्षांची छाटणी करून पर्यटन मार्ग मोकळा करून देण्यात आला.यावेळी गौतम पाटील,विलास मोहिणकर,अमित मोदी,रोहन नन्नावरे,अक्षय नागरीकर,श्याम दुधनकर व आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved