Breaking News

पर्यावरण संवर्धन विकास समितीचे सर्वोदय विद्यालयात वृक्षारोपण

स्पेक्ट्रम फॉउंडेशन चा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

राळेगाव :- राळेगांव तालुक्यातील पं.स.अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेत पर्यावरण संवर्धन विकास समिती च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करून ” एक पेड माँ के नाम ” उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी स्पेक्ट्रम फॉउंडेशन विभागाकडून झाडे उपलब्ध करुन दिले.यावेळी विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक टी.झेड.माथनकर,व्हि.एन.लोडे,पि.पि.आसुटकर,आर.एस.वाघमारे शिक्षकेतर कर्मचारी बी.बी.कामटी,व्हि.टी.दुमोरे,एस.एम.बावने,एस.वाय.भोयर, स्पेक्ट्रम फॉउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी कुंदन कोडापे यांच्या सह पर्यावरण संवर्धन विकास समिती राळेगाव उपाध्यक्ष अजय मांडवकर, अरविंद कोडापे तालुका संघटक राळेगांव व विद्यार्थी उपस्थित होते..

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved