Breaking News

वाघाच्या बंदोबस्तासाठी युवक कॉग्रसचे वन अधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा – साईश वारजूकर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर :- चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव वन्यजीव संघर्ष वाढत असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना 4 जुर्ले ला घडली आहे त्यात गरडापार किटाळी उरकुडपार नवेगाव येथील गावातील शेतकरी असून या गावा मधील नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या अनुषंगाने आज दिनांक 5 जुर्ले ला महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रसचे महासचिव साईश सतिश वारजूकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिमूर येथे जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त करण्याचे निवेदन देऊन गरडापार गावात जावून गस्तीवर असेलेले वनपरिक्षेत्र अधिकारी
देउळकर व नागरीक यांच्याशी सवांद साधला आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे विधान सभा अध्यक्ष रोशन ढोक. तालुका सरचिटणीस विलास मोहीनकर युवक कॉग्रेसचे विधान सभा उपाध्यक्ष प्रशांत डवले युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव रोहन नन्नावरे अक्षय लांजेवार अक्षय नागरीकर राहुल पिसे अमित मेश्राम सौरव जस्वाल आदी कॉग्रेस पदाअधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved