आरोग्य शिबिराचा १३० च्यावर लाभार्थ्यांनी घेतला लाभ
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- आयुष्मान आरोग्य मंदिर कोथूर्णा( आयुष ) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आला. त्यात १३० च्यावर लाभार्थ्यांनी आरोग्याची तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन कोथूर्णा येथील सरपंच प्रदिप गायधने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच गिताताई ईश्वरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील प्रणिता चोपकर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा सहारे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सोनटक्के, योग शिक्षका सारिका नागपूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिराची सुरुवात धन्वंतरी पूजन करून योग शिबिर घेण्यात आले. मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना आयुर्वेद व त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. व जेष्ठ नागरिकांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान आरोग्य मंदिर परिसरामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण करून आरोग्य तपासणी करण्यात आली. आणि व्याधीग्रस्त नागरिकांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात आले.
आरोग्य शिबीरात उच्च रक्तदाब, मधुमेह, वातविकार संधी विकार, नेत्र विकार, रक्तालपता, नस्य अशा विविध प्रकारचे चिकित्सा उपक्रम राबवण्यात आले.या शिबिरामध्ये १३० च्यावर लाभार्थ्यांनी आरोग्याची तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.नविन डेकाटे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.भास्कर खेडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अर्चना सोनटक्के वैद्यकीय अधिकारी कोथूर्णा, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.पूजा गजभिये,सामुदायिक आरोग्य अधिकारी कु. अंजली भटकर, कोथूर्णा येथील आरोग्य सेविका के.पी. जाधव,आरोग्य सेवक डी.एस.खंडाते,आरोग्य सेवक हंसराज बडोले, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप लांजेवार,नेत्र तपासणी ओपथालमिक अधिकारी कु. कोमल गेडाम व आशा वर्कर कोथूर्णा, यांच्या सहभागाने आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडला.