जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
बाभूळगाव :- येथील तहसील कार्यालया समोर जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने आज गुरुवार १९ /०९ /२०२४ सकाळी ११ वाजता पासुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपालजी डोफे सह पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत ग्रामीण भागातील कामगार यांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का मिळण्यासाठी आमरण उपोषण जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे ग्रामीण भागातील कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का मिळण्यासाठी कामगारांना अनेक वेळा येरझारा मारुन सुध्दा प्रमाणपत्रावर सही व शिक्का मीळत नाही.
त्यामुळे कामगारांवर हा अन्यायच होत आहे हा अन्याय कामगारांवर होऊ नये म्हणून जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या वेळी उपोषण कर्ते रत्नपालजी डोफे संस्थापक अध्यक्ष जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना, महादेव जी गरजे (पाटील) प्रथम तालुकाप्रमुख शिवसेना बाभुळगाव, धर्मपाल माने बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, सम्यक म्हैसकर सचिव कामगार संघटना राळेगाव, संजय शेळके, सहसचिव कामगार संघटना, पत्रकार शेख शेहजाद भाई, गजनान वानखडे विदर्भ अध्यक्ष छावा संघटना,विक्रम लाकडे उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट बाभुळगाव, सतीष कावळे उपतालुका प्रमुख शिवसेना उभाठा,योगेश कवडे विभाग प्रमुख शिवसेना उभाठा,अजय जाधव माजी उपसरपंच करळगाव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुधीर कडूकार,माधव नेरकर माजी सरपंच खडकसवंगा, श्रीकांत घोंगडे सरपंच, सुनील कांगले सरपंच फत्तेपूर, अविनाश अजमिरे उपसरपंच फत्तेपूर, कॉ गुलाब उमरतकर, विष्णू राऊत शहरध्यक्ष कामगार संघटना बाभुळगाव,अशोकराव महानुर, वसंत भितकर, किशोर शिरभाते सदस्य ग्रा.प.वाटखेड(बु) रामेश्वर परकुंडे,राम देवघरे, मो.जावेद मो.रफिक बंडू वाईकर,कृष्णा राठोड ,विजय मेंढे, प्रवीण लोखंडे संतोष सोनटक्के, सुरेश खंडारे आदी उपस्थित होते जिल्ह्यातील विविध संघटनेचा आमरण उपोषणाला पाठींबा देण्यात आलेले आहे