Breaking News

४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ८६ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था

  • ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
    ८६ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था

    नागपूर, ता. १ : केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुरूवारी (ता. १ एप्रिल) ४५ वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. या लसीकरण मोहिमेला पहिल्याच दिवशी शहरातील शासकीय व खाजगी अशा दोन्ही ८६ केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर श्री. दयाशंकर तिवारी व आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी शहरवासीयांचे अभिनंदन करून पुढेही नियमांच्या पालनासह लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
    शहरामध्ये ४६ खाजगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांसह मनपा कर्मचारी, पोलिस, उपद्रव शोध पथक, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, रेल्वे, बँक, बीएसएनएल, डाक, भारतीय खाद्य महामंडळ, विद्युत विभाग, शिक्षक, एलपीजी कर्मचारी, इंसिडेंट कमांडर आदी कर्मचा-यांचे लसीकरणालाही सर्वच केंद्रांवर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व लकडगंज झोन समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र बोरकर व सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी बाबुलबन व पारडी लसीकरण केन्द्राला भेट देवून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
    शासनाच्या निर्देशाने ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी मिळणारा लाभ व लसीकरण केंद्रावर मनपातर्फे करण्यात आलेली व्यवस्था यासंदर्भात अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यासोबतच नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचेही आवाहन नागरिकांतर्फे करण्यात आले आहे.
    ५० वर्षीय ॲड.सुर्यकांत गजभिये यांनी लसीकरणाचा लाभ मिळाल्याबद्दल शासनाचे व मनपाचे आभार मानले. लसीकरण घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नसून लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने आवर्जून कोव्हिड लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
    श्री. मिलिंद पांडे यांनी लसीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान कुठलेही त्रास झाले नसल्याचे सांगितले. लसीकरण केंद्रावर असलेले व्यवस्थापन व कर्मचा-यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
    श्रीमती सुलोचना महल्ले यांनी ४५ वर्षावरील वयोगटातून आपण लस घेतली असून इतर सर्व पात्र लाभार्थ्यांनीही लस घ्यावी, असे आवाहन केले.
    श्री. चंद्रशेखर पेशकार व श्रीमती केतकी पेशकार यांनी लस घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, यापूर्वी ज्येष्ठांच्या लसीकरणामध्ये आईचे लसीकरणाचे दोन्ही डोज घेउन झालेले आहे. आजपर्यंत त्यांना कुठलाही त्रास झालेली नसून लस पूर्णत: सुरक्षित आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने लसीकरण ही अत्यंत आवश्यक बाब आहे. लसीकरणासाठी मनपाद्वारे उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही व्यवस्था आहे. नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता कोणत्याही केंद्रावर जाउन लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
    ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून लस घेतलल्या बँक कर्मचारी भाविका चोटवानी यांनी लसीकरणाचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज बँकर्ससह इतर कर्मचा-यांसाठी ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून लसीकरणाला सुरूवात झाली असल्याने सर्व कर्मचा-यांनी लसीकरणासाठी पुढे यावे. ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून काम करताना अनेकदा आपण कुणाच्या संपर्कात येतो हे लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याने लस घ्यावी, असे त्या म्हणाल्या.
    बँक कर्मचारी मोहित अरोरा यांनी शासनातर्फे आवाहन करण्यात येत असलेल्या सर्व ‘फ्रंटलाईन वर्कर्स’नी लस घ्यावी, असे आवाहन केले. शिरीष जोशी यांनी आजच्या काळात लसीची अत्यंत गरज असताना सर्व कर्मचा-यांना लस मिळत असल्याने समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
    स्व.प्रभाकरराव दटके महाल रोग निदान केन्द्र येथे सकाळी ९ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत दोन पाळीमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. तसेच हंसापुरी आयुर्वेदीक दवाखान्यात देखील लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. याठिकाणी सर्व स्तरातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.ख्वाजा मोईउद्दीन व प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.सीता कडू यांनी दिली. याठिकाणी ७७ वर्षीय अंजनी ततकडे, ४५ वर्षीय संजय पुसदकर, ५३ वर्षीय जोत्स्ना रामकोरीया यांनी लसीकरणाचे व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved