Breaking News

बोगस खतांची सर्रासपणे विक्री करणे पडले महागात

-बळीराजाच्या मदतीला धावलेल्या प्रहार संघटनेला &कांग्रेस पक्षाला यश-

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथे श्री दत्त कृषी केंद्रातुन बोगस खते सर्रासपणे विक्री करत असल्याची तक्रार शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी जिल्हाकृषी अधिकारी चंद्रपुर यांच्याकडे केली होती, मात्र तक्रारीची दखल घेतल्या जात नव्हती व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी केला, या संदर्भात प्रकरणाची माहिती ठाकरे यांनी चंद्रपूर प्रहार संघटनेचे महेश भाऊ हजारे यांना दुरध्वनी द्वारे दिली, त्यांनी त्वरित चिमूर तालुक्यातील प्रहार सेवक यांना माहिती दिली.

ताबडतोब विनोद ऊमरे हे थेट शंकरपुरला पोहचले व घडलेला प्रकार आनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या संबंधित कृषी अधीकारी चंद्रपूर यांना लेखी दिली मात्र त्या लेखीचा आजपर्यंत समाधानकारक काही ऊत्तर न मिळाल्याने त्या अनुशंगाने दि, 28 आगस्ट ला शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपसभापती रोशन ढोक हे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचले व प्रहार संघटनेचे महेश हजारे यांना सोबत घेऊन चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथील शेतकऱ्यांना बोगस खते विक्री करू फसवणुक करनारे,

श्री दत्त कृषी केंद्राचे मालक राजु वैद्य शंकरपुर यांच्यावर कार्यवाही करुण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवुन देण्यात यावी. व श्री दत्त कृषी केंद्र शंकरपुर याचा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलायवर सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करु आसा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष,चंद्रपुर व काँग्रेस पक्ष चिमुर च्या वतिने लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आला व पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भुमीका मांडण्यात आली.

महेश हजारे,प्रहारसेवक चंद्रपुर , व सोबत काँग्रेस पक्ष चिमूरचे ता.कार्याध्यक्ष विजय गावंडे, रोशन ढोक उपसभापती पं.समिती चिमुर, अफरोज अली,कोरपना , अशिद मेश्राम चिमुर व शेतकरी कमलाकर ठाकरे ,अशिष ठाकरे ,नकुल राऊत ,ऊद्वव खाडे, किशोर चौधरी,सुरेश भिवनकर, मारोती राजुरकर व इतर उपस्थित होत.

श्री दत्त कृषी केंद्र बोगस खत विक्री प्रकरण :- कृषी केंद्र संचालकाच्या समर्थनात उतरले काही शेतकरी पत्रकार परिषद घेऊन राजु वैद्य यांनी केले आरोपाचे खंडण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहरातील अनेक प्रभागातील अन उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत नागरिक त्रस्त

  अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवा व शहरातील …

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर काही घरची पडझड

“तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार बंटी भांगडीया यांनी दिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved