
सोलापूर :- दि.२८/०९/२०२१ भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी महाराष्ट्र यांच्या सोलापूर शाखेच्या वतीने प्रबोधन कार्यकर्ता शिबिराचे आयोजित करण्यात आले, यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष राजेंद्रजी जाधव यांचे अध्यक्षतेखाली कार्यकर्ता शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
यावेळी महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ. विद्या माने व त्यांचे पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या उपस्थित लवकरच सोलापूर नगर पालिकेच्या निवडणूक होणार असून निवडणुकीवर बाबत चर्चा व शिबिरात शिबिरार्थींस मार्ग-दर्शन करण्यात आले.
यावेळी शिबिरार्थीनी निवडणुकीवर आपले मनोगत व्यक्त केले, व या निवडणुकीत आम्ही आपल्या पार्टीतर्फे किमान ८० ते ८५ जागेवर उमेदवार उभे करणार यात महिला उमेदवारांचाही समावेश करण्यात आला आहे. यावेळी शिबिरास किमान १५० शिबिरार्थी सहभागी झाले होते, भारतीय माववाधिकार पार्टी, महाराष्ट, अध्यक्ष एस.एल. ,गायकवाड पार्टी चे उपाध्यक्ष नारायण पां. गायकवाड, महिला आघाडी अध्यक्षा रेखा गायकवाड व आप्पा माने सामाजिक कार्यकर्ता पिंपरी चिंचवड
ह्या मान्यवरांनी शिबीराला मार्गदर्शन केले व निवडणुकीसाठी
इछुक उमेदवारांची यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली.
यावेळी सर्वाना पार्टीचे नियुक्ती पत्रक देऊन त्यांचा पार्टी कडून शाल श्रीफळ व पुष्प-गुच्छ देवुन सर्वाना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय पदाधिकारी उपस्थित होते.