शिवसेनेच्या वतीने पोलीस विभागाला चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
उमरेड:-दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमरेड यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण यांना निवेदन दिले.उमरेड शहर व ग्रामीण भागात मागील एक वर्षांपासून सतत आठ खुन झालेले असून, हॉप मर्डरची गिनती नाही व बलात्कारचे प्रमाण वाढलेले आहे. अवैध धंदे म्हणजे रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक, ट्रॅव्हल्स, ओव्हरलोड ट्रक व रेतीची अवैध विक्री, जुगार, सट्टापट्टी, अवैध दारू विक्री, नशीले तंबाखु, गांजा विक्री, नशीले पदार्थ विक्री सार्वजनिक स्थळावर सेवन करणे खुलेआम सुरू आहे. तसेच ट्राफीक पोलीसाकडून नागरिकांची खुलेआम लुट चालू आहे.
राजस्व अधिकाऱ्यांशी संगनमत करून बांधकाम साहित्य गिट्टी, रेती, मुरूम, कोळसा इ. खनिजांचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक व तस्करी सुरू आहे. शहरात नागरिकांचे गैरहजेरीचा फायदा घेवून मोठ्या प्रमाणात घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच ग्रामीण भागात शेतातील शेतमाल उदा. इलेक्ट्रीक मोटारपंप य शेतीउपयोगी अवजारांची सतत चोरी होत असल्याचे गुन्हे आढळून येत आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच विद्यार्थी तरूणावर व समाजावर याचा दुष्परिणाम होतो.
जनमाणसात संबंधीत प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रीयतेबद्दल रोष निर्माण झालेला आहे व सतत गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याने शांतता भंग होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत संबंधीत प्रशासकीय विभाग व अधिकारी यांचेकडून तात्काळ लक्ष पुरविणे व उपाय करणे आवश्यक झालेले आहे. शहरातील विस्कळीत कायदा व सुव्यवस्था जनहिताला पोषक होईल असे वातावरण निर्माण करणे नितांत जरूरी झाले आहे. अशा परिस्थितीत संबंधीत प्रशासक विभाग व पोलिस यंत्रणा यांनी गांभीर्याने लक्ष देणे सुध्दा जरुरीचे असल्याचे उमरेड शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
पोलीस विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास अन्यथा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
याकरिता
* गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
* पोलीस महासंचालक (ग्रामीण), मुंबई,
*पोलीस महानिरिक्षक (ग्रामीण), नागपूर,
*मुख्यमंत्री यांचे सचिवालय, नागपूर, *जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांना प्रतिलिपी देण्यात आले, यावेळी शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे , गोपाल पाल, बाबा रोहाळ, संदीप गुंपलवार, रमेश महातळे,राकेश पाटील,राजेश देशपांडे ,चंद्र विकास दांडेकर, सोनबाजी लाडस्कर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.