अन्याय निवारण समिती चिमूर
राष्ट्रसंत तुकडोजी नागरी पतसंस्था घोटाळा प्रकरण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित चिमुर र.न.८०३ येथे ७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयाची अफरातफरीचे प्रकरणातील आरोपीना अटक करण्याच्या मागणी करीती २६ एफ्रिल पासुन संस्थेतील खातेदार, ठेवीदार अन्याय निवारण समिती तर्फे तहसील कार्यालया पुढे साखळी उपोषण सुरू आहे. या दरम्यान घोटाळेबाजांना अटक झाली नाही. त्यामुळे आज दिनांक 10 मे रोजी अन्याय निवारण समितीने मुंडण आंदोलन करीत शासनाचा निषेध केला.
आता घोटाळेबाजांना अटक होई पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या साखळी उपोषणा नंतरही पत संस्थेच्या घोटाळेबाजांना अटक झाली नसल्याने आज दिनांक 10 मे रोजी अन्याय निवारण समिती तर्फे गिरिधर मोहिनकर. अमर कारमेंगे यांनी मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. यादरम्यान विविध प्रकारचे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.
यावेळेस शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, प्रवीण बारापत्रे, अजय चौधरी, सुनिता कामडी, अविनाश रासेकर, मोरेश्वर बाहुरे, मणिष पटेल, गिरीधर मोहिनकर,अमर काळमेघे, महेश वनकर,, नाजमा अक्रम शेख, दिक्षा शिवरकर, संगिता चन्ने, उद्धव डेकाटे इत्यादी उपस्थित होते