
न सांगता ग्राहकांचे खाते हातळण्याचा प्रकार
ग्राहकांना अंधारात ठेवून खात्याचे पैसे केले ट्रांसफर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी : – ग्रामीण जनता आपल्या घामाचा पैसा सुरक्षीत राहावा यासाठी बँकेत खाते उघळून त्यात आपली पैसा ठेवतात.बँकेतील खात्यांची देखरेख करण्यासाठी, खात्यांचे व्यवहार व्यवस्थीत चालविण्यासाठी बँकेत मॅनेजर, बाबू, कॅशीअर असे विवीध कर्मचारी कार्यरत असतात.बँकेत सुरू असलेले खाते हाताळण्याची, त्यामधून व्यवहार करण्याचे सर्वस्वी अधीकार हे ग्राहकांचे म्हणजे खातेधारकांचेच असतात परंतु जर बँक मॅनेजर स्वताःच खातेधारकांचे खाते हाताळून त्यामध्ये असलेली रक्कम दुसऱ्या खात्यात वळती (ट्रांसफर ) करीत असेल तर खातेधारकांचा खात्यातीत जमा रकमेची हमी कोण घेणार.ग्राहकांच्या खात्यामधील रक्कम ग्राहकाला सुचना न देता बँक मॅनेजर नी परस्पर दुसऱ्या खात्यात वळती केल्याची घटना भिसी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये घडली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भिसी येथेआर्यनी सव्र्हिसेस च्या नावाने CC ( कॅश क्रेडिट )अकाऊंट आहे. निलीमा जाधव या महीला खातेधारकाचे नाव आहे. CC खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे खाते ओव्हर ड्यू झाले होते. सदर खात्यामध्ये पैसे भरण्याची सुचना बँकेकडून यायला पाहीजे परंतु तसे न करता बॅंक मॅनेजर वैशाली गहूकर यांनी राजेन्द्र जाधव व निलीमा जाधव यांच्या संयुक्त खात्यामधील रक्कम खातेधारकांना सुचना न देता 13 जून ला परस्पर CC खात्यामध्ये वळती केली.आपल्या खात्यामधील रक्कम गहाळ झाल्याचे लक्षात येताच राजेन्द्र जाधव यांनी बॅंकेत जाऊन विचारणा केली असता ” बॅंक मॅनेजर ने तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मुख्यालयात माझी तक्रार करा, माझ्या ऑफीस मधून बाहेर निघा अन्यथा मी तुमची पोलीसात तक्रार करेल” अशा भाषेत उत्तर दिले. महत्वाची बाब म्हणजे राजेन्द्र जाधव यांच्याकडे बॅंक ऑफ महाराष्ट्र चे अधिकृत बिसी सेंन्टर असुन परीसरातील 1O ते 12 गावांमध्ये घरोघरी जावून बॅंकेच्या खातेधारकांना ऑनलाईन सेवा देतात.
………………………………………..
खातेधारकांचे खात्याची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्याची ही पहीलीच घटना नसुन याआधी अनेक खातेधारकांसोबत असे प्रकार घडले आहेत हे महत्वाचे.
………………………………………..
मि मागील दोन महिण्यांपासुन माझे ऑपरेशन झाल्यामुळे मि बेडरेस्ट वर आहो. आर्यनि सर्विसेस या नावाने CC आहे. सदर खाते माझी पत्नी निलीमा जाधव हिच्या नावे आहे. CC खात्यात रक्कम पुरेशी नसल्यामुळे खाते ओव्हर ड्यू झाले होते, व रक्कम जुळताच खात्यात जमा करण्याची माहीती बॅंकेला दिली होती,परंतु मला कोणतीही सुचना न देता माझ्या सेवींग खात्याची रक्कम बँक मॅनेजर वैशाली गहुकर यांनी परस्पर CC खात्यात वळती केली. अनेक खातेधारकांशी बँक मॅनेजर चा व्यवहार हा मनमर्जीचा आहे. फक्त मोठे खातेधारकांनाच बँक मॅनेजर कडून चांगली वागणूक दिली जाते. मि माझ्या खात्या मधून गहाळ झालल्या रक्कम बद्यल माहीती घेण्यासाठी गेलो असता त्यांनी माझ्याकडे असलेले बँकेचे बिसी सेंटर काढून घेण्याची व पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली.
खातेदार-राजेन्द्र जाधव , पुयारदंड
………………………………………..
मि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सोने तारण केले आहे.( गहाण ठेवले आहे ). दर महीण्याच्या 14 तारखेला त्याची किस्त CC खात्यामधून भरल्या जाते. चार महीण्यापूर्वी बॅंक मॅनेजर वैशाली गहुकर यांनी महीण्याच्या 8 तारखेला माझ्या सेवींग खात्यामधून गोल्ड लोन ची रक्कम कापली. याबद्यल त्यांना विचारना केली असता मला सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देऊन अरेरावी च्या भाषेत उत्तर दिले. मी याची तक्रार वरीष्ठांकडे करणार असे म्हटल्यावर” तुम्हाला जे करायचे ते करा, असे म्हणून पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली होती.
खातेदार- पंकज मिश्रा, भिसी.