Breaking News

शनिवारी चिमूर येथे पुस्तक प्रकाशन तथा कविसंमेलनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-कवी प्रकाश कोडापे यांच्या संघर्ष काव्यसंग्रहाचे प्रकाशन, कविसंमेलन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन शनिवार,दि.२४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील पंचायत समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात करण्यात आले आहे.
पुस्तक प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत भूपेश पाटील यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भद्रावती येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुधीर मोते भूषवणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. देवमन कामडी,उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद किन्नाके,डॉ.प्रकाश वट्टी,कवयित्री कल्पना गेडाम,सामाजिक कार्यकर्ते सुंदर गावडे,कवी राजू डहाके आदी उपस्थित राहणार आहेत.काव्यसंग्रहवर कवी सुरेश डांगे भाष्य करतील.याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.कविसंमेलनाचे अध्यक्ष भद्रावती येथील कवी प्रवीण आडेकर असून प्रमुख अतिथी म्हणून कवी पंडित लोंढे,कवी बेनिराम ब्राम्हणकर उपस्थित राहणार आहेत.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रपूर येथील युवा कवी स्वप्नील मेश्राम करणार आहेत. पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन तथा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,दाई जंगो रायताड गोंडीयन बहूउद्देशीय संस्था आणि आफ्रोट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved