Breaking News

चिमूर शहर विविध समस्यांच्या विळख्यात

चिमूर नगर परिषद अंतर्गत समस्या चे निवेदन मुख्यमंत्री यांना दिले

चिमूर शहर काँग्रेस ने उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर सारखा ऐतेहासिक नगरीत नगर परिषद अंतर्गत अनेक समस्या संदर्भात गलथानपणा व दुर्लक्षिनतेमुळे जनतेला दैनंदिन जिवन प्रणालीत अनेक अडचणींचा समोर जावे लागते सामाजिक आरोग्य व सामाजिक गरजा यांचा वेळ नगर परिषदेच्या निरुत्साही व भ्रष्टाचारी वृत्तीमुळे जनता पुर्णतः हतबल आहे. वारंवार न. प . ला. अवगत करून सुद्धा प्रशासन कार्यात सुधारणा नाही जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. नप प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याने या संदर्भात विविध मागण्याचे निवेदन चिमूर शहर काँग्रेसच्या वतीने मा .उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात चिमूर शहराची आठवडी बाजाराची जागा निश्चित करावी, नळ पाईप लाईन खोदकाम मुळे जनतेला त्रास होत असल्याने व्यवस्था करावी,नप ला अंगणवाड्या हस्तातरीत करण्यात याव्या,नप हद्दीतील ग्रामीण भागात नागरिक योजना वंचित रहावे लागत आहे, जीप पस योजना नप हद्दीत राबविण्यात याव्या,वडाळा पैकु ग्राम पंचायत चे दस्तऐवज हस्तातरित करण्यास आदेश द्यावे,

शहरातील फोडलेल्या नाल्या दुरस्त कराव्या,पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा हप्ता द्यावा,नप हद्दीत परिसरात उद्याने करण्यात यावे, मेन रोड वर सुलभ शौचालय करण्यात यावे,नप मध्ये आकृती बंध कर्मचारी नियुक्त करावे, रोजंदारी कर्मचारी यांना कायमचे सेवेत रुजू करावे, एम एस ई बी ने शेतकऱ्यांना पूर्ण वेळ विद्युत पुरवठा करण्यात यावा,नप हद्दीत अतिक्रमण धारकांना पट्टे देण्यात यावे, नप हद्दीत प्रत्येक प्रभागात विद्युत पोल उभे करून आहे.परंतु लाईट लावले नाही म्हणून तात्काळ लाईट लावण्यात यावे, शहरात मोकाट जनावरे, डुक्कर , कुत्रे , गाई बैल व इत्यादी यांचा बदोबत करण्यात यावे यावा, शहरात मुख्य रस्त्यावरील डीवायडरवर दोन्ही बाजूला स्टील रेलिंग लावण्यात यावी. असे अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देत असताना चिमूर शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख , माजी सरपंच बाळू बोभाटे, तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, तालुका काँग्रेस ओबोसी अध्यक्ष विलास डांगे , शहर उपाध्यक्ष अमोल जुनघरे शहर यु .संघटक अक्षय लांजेवार , श्रीकांत गेडाम,अभिजित बुरुले, प्रीती दिडमुठे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved