जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-मणिपूर येथे हजारो लोकांच्या गर्दीने दोन स्त्रियांवर अमानुषपणे अन्याय अत्याचार केला.ज्यामुळे संपूर्ण जगात देशाची मान शरमेने खाली गेली आहे.या घटनेचा तसेच याला कारणीभुत घटकाचा २४ जुलै सोमवारला राष्ट्र सेवा दल चिमूर तर्फे निषेध करून समाजकंठकांना कठोर शिका देण्याचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.मणिपूर मागील अनेक दिवसापासून धुमसत आहे.यात होणाऱ्या हिंसाचारात महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत. तसा व्हिडिओ समाज माध्यमावर आल्याने सर्व स्तरातून निषेध केल्या जात आहे.अशा घटनेने आणखी त्यास खतपाणी घातल्याने समाजात महिला सुरक्षितता धोक्यात आलेली आहे.
महिला अत्याचाराचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. माणुसकिला काळीमा फासणारा आणी निंदणीय अशा मनिपूरच्या घटनेचा राष्ट्र सेवा दलातर्फे तीव्र शब्दात निषेध करून सर्व आरोपीना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार प्राजक्ता बुरांडे यांचे मार्फत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष रावण शेरकुरे,सेवा मंडळ सदस्य सुरेश डांगे,कोषाध्यक्ष रामदास कामडी,पूर्ण वेळ कार्यकर्ता इमरान कुरेशी, प्रल्हाद बोरकर,प्रकाश कोडापे, जितेंद्र सहारे,होमराज सिडाम,कैलास बोरकर,संजय सर,कवडू लोहकरे,भूपेंद्र गरमडे, सुशील नगराळे,प्रमोद तितरे,मनोज राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.