Breaking News

चालत्या बसच्या खिडकीतून घेतली महिलेने उडी,मात्र जिवीत हानी टळली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर येथून नेरी रोड चिमूर पासून ३ किलोमीटर अंतरावर एका महिलेने चालत्या बसच्या खिडकीतून खाली उडी मारल्याचा प्रकरण घडला असून बस चालक वाहक यांनी ताबडतोब तिला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.चिमूर आगाराची, चिमूर – सिंदेवाही बस सिंदेवाही करिता निघाली असता, चिमूर पासून तीन किलोमिटर अंतरावर बस गेल्यावर नेरी रोडला सौ.स्वाती प्रशांत येसांबरे वय २८ वर्ष राहणार तळोधी या महिलेने चालत्या बसच्या खिडकितून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मागून कोणतेही अवजड वाहन येत नसल्याने सुदैवाने ती महिला वाचली, बस चालक व वाहक यांनी तिला ताबडतोब उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांनी प्राथमिक उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केले. या अनुचित प्रकारामुळे चिमूर आगारातील दोन बसेस आजच्या दिवशी बंद कराव्या लागल्या, त्यामुळे चिमूर आगाराचे मात्र यात नुकसान झाले. वृत्त लीहेपर्यंत चिमूर बस आगार तर्फे चिमूर पोलीस स्टेशनला कोणतीच लेखी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved