जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर आला. यात आर्णी तालुक्यातील बोरगाव पुंजी. कुऱ्हा.तळणी व घाटंजी तालुक्यातील कुऱ्हाडा डांगरगाव. चांदापूर. कोळी.लिंगी चिंचोली गावांना नदीला.नाल्याला आलेल्या पुराचा जोरदार फटका बसला घरात पाणी शिरले. शेतीचे नुकसान झाले.पूरग्रस्त गावांना डॉ. विष्णू उकंडे ( शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट ) यांनी भेट देऊन शेतीचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. कुऱ्हा (तळणी ) गावाला भेट देऊन शेती नुकसानीची पाहणी केली. बोरगाव पुंजी ग्रामपंचायत ला भेट देऊन सरपंच व भांबोरा वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची चर्चा केली.येथील भोई पुरा या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
घाटंजी तालुक्यातील डांगरगाव गावाला भेट देऊन डांगरगाव चे सरपंच प्रकाश खोडे. तलाठी बोंडे. कृषी सहायक जाधव. ग्रामसेवक शिरभाते व गावातील नागरिक व शेतकऱ्या सोबत पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटंजी तालुक्यातील चंद्रपूर येथील श्री गुरुदेव आश्रम शाळेला भेट दिली. पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन 95 विद्यार्थ्यांना प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने तळणी ग्रामपंचायत येते हलवण्यात आले होते.
शाळेमध्ये डॉक्टर विष्णू उकंडे यांनी भेट देऊन भविष्यात पुराचा धोका टाळण्यासाठी उपाय योजना संदर्भात श्री गुरुदेव आश्रम शाळा..प्राथमिक चे मेश्राम सर व माध्यमिक चे वानखडे सर शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते