ट्रायबल फोरम : राष्ट्रपती राजवटही लागू करा.पंतप्रधानांकडे मागणी
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ:-मणिपूर राज्यात दोन महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामुहिक बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा.आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी ट्रायबल फोरमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे.
या संदर्भात तहसिलदार यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये जमावाने कुकी जमातीच्या दोन महीलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेचा ट्रायबल फोरम,ट्रायबल युथ फोरमच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला आहे.
मणिपूर राज्यात ४ मे २०२३ रोजी कुकी जमातीच्या दोन महिलांना काही नराधमांनी घेरले.त्यांनी त्या महीलांना विवस्त्र करुन त्यांची भररस्त्यात नग्न धिंड काढली.त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.
मन हेलावून टाकणारी घटना घडली असून जगातील मानवतेला या घटनेने काळीमा फासला आहे.सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात असे घ्रुणास्पद क्रुत्य लांछनास्पद आहे. संविधानाच्या अधिकाराचं जाहीरपणे उल्लंघन होत आहे.
गत मे महिण्यापासून मणिपूर राज्यात सातत्याने कुकी या आदिवासी समाजावर अनन्वित अन्याय, अत्याचार,जाळपोळ,जातीय हिंसा,सामुहिक बलात्कार होत आहे.तरी सुद्धा केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी पथके पाठवली नाहीत. वांशिक संघर्ष थांबविण्यासाठी कठोर भूमिका घेतलेली नाही.असा आरोप करण्यात आला आहे.
या देशातील मूळनिवासी असलेला आदिवासी समाज आजही आपल्याच मायभूमीत सुरक्षित नसल्याचे वास्तव चित्र अधोरेखित झाले आहे.
मणिपूर मधील राज्यसरकारने कठोर पावले न उचलल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.त्यामुळे सरकार बरखास्त करुन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.
यावेळी ट्रायबल फोरमचे तालुकाध्यक्ष शंकर पंधरे, तालुका महासचिव संजीव मडावी,उपाध्यक्ष सुनील मेश्राम, अजय जुमनाके,प्रविण कुळसंगे,रुषिनाथ मडावी, सुरज सलाम, रामदास परचाके, गजानन सिडाम, राहूल आत्राम, विनोद सिडाम, रजनीकांत परचाके, सदाशिव परचाके, यादव सुकळी,प्रमोद पेंदोर,संतोष कुमरे आदी उपस्थित होते.
*अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली?*
मणिपूर राज्यात मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून,कांगलेईपाक कनबा लुप,अरामबाई तेंगगोल,विश्व मैतेई परिषद या संघटनांच्या ८०० ते १००० कार्यकर्त्यांना अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली ? याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. आणि या संघटनांवर बंदी आणावी.
*कोट*
देशात एकीकडे बेटी बचाव,बेटी पढाओ चा नारा,महिला सक्षमीकरण तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार किती विसंगत परिस्थिती. महिलांवरील घ्रुणास्पद अत्याचार सहन केल्या जाणार नाहीत. नराधमांना फासावर लटकवा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा.
– शंकर पंधरे तालुकाध्यक्ष
ट्रायबल फोरम राळेगांव.