मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आली भव्य रॅली
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ)
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि.१०/८/२०२३ गुरुवारला सायं.५:३०वाजता मुख्य उडान पुल येथे जननायक बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापुरूषांचा जयघोष करीत व कलंकित घटना मणिपूर येथील जमावांकडून आदिवासी समाजावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करीत महिलांना निर्वस्त्र करून शहराच्या प्रमुख मार्गाने शरीराचे लचके तोडत,स्त्रीयांची विटंबना करून सार्वजनिकरित्या भर रस्त्यावर महिलांवर सामूहिक बलत्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा तथा फाशी द्या अशा घोषणा देत संपुर्ण गावभर रॅली काढून जन आक्रोश करण्यात आला.
पिंपळापूर रोड बिरसामुंडा चौक नामकरण फलकावरील शहीद बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन डॉ.प्रेमदासजी कांबळे यांचे अध्यक्षतेखाली,प्रमुख वक्ता मा.रामचंद्रजी आत्राम सर,प्रमुख पाहुणे मा.शरदभाऊ सराटे ग्रा.पं.सदस्य वडकी,मार्गदर्शक मा.सुनिल केराम सर समारोपीय कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे संचलन सौ.शिलाताई जंगीलवार,प्रास्ताविक मनोज क्षिरसागर तर आभार प्रदर्शन प्रा.सोमेश्वर केराम सर यांनी केले.या रॅलीत २०० ते २५० जनसमूदाय व सर्व धर्मीय समाज सहभागी होता.