जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ)
यवतमाळ:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा खैरगाव जवादे येथे ट्रायबल फोरम शाखा खैरगाव जवादेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करण्यात आले.मणिपूर मध्ये जमावाने चार मे रोजी दोन आदिवासी महिलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या घटनेने संपूर्ण देश हादरला असुन देशातील महिलांना विवस्त्र करून धिंड काढणे आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणे, हि घटना मानव जातीचे मन हेलावून टाकणारी आहे. सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. नंतर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. ह्यावेळी शुभम मडावी शाखा अध्यक्ष ट्रायबल फोरम खैरगाव जवादे,धिरज मेश्राम, राजु कुळसंगे, नारायण परचाके, नानाजी मेश्राम, संतोष वडडे, मारोती मडावी, सुधाकर गेडाम, भास्कर गेडाम, विलास भलावी, शंकर भलावी, माणिक सिडाम, शालीक सिडाम, प्रतिभा कुळसंगे,रूखमा तोडासे ग्रामपंचायत सदस्याआदी महिला, पुरुष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.