Breaking News

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि.21 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि. 25 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 28 ऑगस्ट रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 30 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर तर 31 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved