Breaking News

वडकी येथे एकता मंडळाच्या वतीने भव्य नंदीसजावट स्पर्धेचे आयोजन


जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एकता मंडळाच्या वतीने भव्य नंदीसजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नंदी सजावट स्पर्धेत वडकी तसेच परीसरातील ४०० ते ५०० स्पर्धकांनी आपल्या नंदिबैलाला शेतकरी,शेतकरी आत्महत्या,पर्यावरण, स्त्रीभ्रूणहत्या,सामाजिक ऐकोपा,विज्ञानाची प्रगती,शिक्षणाचे महत्व, वृक्षतोडीमुळे होणारे परीणाम,यासारखे देखावे करुन आपल्या नंदिबैलाची सजावट करुन नंदीबैल सजावट स्पर्धेत आले होते.

एकता मंडळाच्या वतीने पण भव्य बक्षिस ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस वनप्लस ३२ इंची टिव्ही ही श्रीनिती ठमके हिने पटकाविले, व्दितीय बक्षिस हे सॅमसंग टाब हे भुषण कडु यांनी पटकाविले, तृतीय बक्षीस सॅमसंग गालिक्स मोबाईल हे विर चाफेकर यांनी पटकाविले , चतुर्थ बक्षिस हे स्मार्ट घड्याळ ही पवन वांढरे यांनी पटकाविले, पाचवे बक्षिस ल्यापटॉप टेबल हे परिनीती काकडे हिने पटकाविले, तर सहावे बक्षिस हे बॅटमिंटन रॉकेट हे निरज ठमके यांनी पटकाविले आहे .या व्यतिरिक्त प्रोत्साहनपर बक्षीस हे सौख्यदा कहुरके, रिक्षश शास्त्रकार, शर्वशी मेश्राम, तरुन पांगुळ,अमर पवार,माऊली उमक, सक्षम काकडे, दिण्यांशी वाणी,साहील अंड्ससकर, ओम पिपराडे,यांना देण्यात आले.

या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन पांढरकवडा येथील कैलास चव्हाण,केंद्रप्रमुख ,विनोद पाटील केंद्रप्रमुख, प्रकाश दवलकर,मुख्याध्यापक, संजय सिडाम मुख्याध्यापक, माधवराव कडु सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे होते तर भव्य नंदीसजावट स्पर्धेचे सुत्रसंचलन राऊत सर, फुटाने सर, मनोज क्षीरसागर यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved