Breaking News

मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा

31 ऑक्टोबर माहिती सादर करण्याची अंतिम तारीख

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5(2)अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस विषयांकित कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार, सप्टेंबर 2023 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ई-आर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलाईन पध्दतीने 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाले आहे. याकरीता सर्व आस्थापनांनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ज्या आस्थापनांना युझरनेम व पासवर्ड मिळाले नाही त्यांनी प्राप्त करुन घ्यावे. तसेच त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. सप्टेंबर 2023 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करुन कायद्याचे अनुपालन करत सहकार्य करावे.

प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी (Employer Profile) तपशील, आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावी, यासंदर्भात सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com /asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर तसेच दुरध्वनी क्रमांक 07172-252295वर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणांस कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved