Breaking News

गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजीत 51 स्पर्धकांचा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/भिसी:-भिसी येथील बस स्टॉप चा राजा नावाने प्रसीद्ध श्री सिध्दीविनायक सार्वजनीक गणेश उत्सव मंडळ च्या वतीने शालेय विद्यार्थासाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील एक कार्य कींवा प्रसंग, स्वच्छ व सुंदर भारत अभीयान, पारंपारिक सण व उत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील एक कार्य कींवा प्रसंग, आजचे प्रगतशील विज्ञान, पर्यावरणातील होणारे बदल आदी विषयावर दि. 8 ऑक्टोंबर ला विठ्ठल रुखमाई सभागृह येथे चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.या स्पधैत 51 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दि. 9 ऑक्टोंबर ला विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. प्रथम बक्षीस रोहीणी धोपटे (1111 रू. ) , व्दितीय बक्षीस रितीका गिल्लूलूरकरकर ( 777 रू) , तृतीय बक्षीस महेश्वरि प्रमोद डोये (555 रु.), चतुर्थ बक्षीस राधिका डोंगरे ( 333 रु.) व सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षीस म्हणून चित्रकला बुक चे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉग्रेस चे चिमुर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर,कृषी उत्पन्न बाजार समीती चिमुर चे संचालक घनशाम डूकरे, पत्रकार पंकज मिश्रा, प्रा. सारंग देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी श्री विद्धिविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भिसी बसस्टॉप चा राजा मंडळ चे अध्यक्ष यश कोथळे,उपाध्यक्ष अक्षय सातपैसे,सचीव अक्षय नागपुरे,वैभव खडके,शैलेश आजवनकर,तेजल
बोरकर,सतिश सांडेकर, विशाल दडमल,मयुर खडके, पियुष वंजारी,हर्षल डोये,कार्तिक राखुंडे, सौरभ खडके,दिलिप मुरकुटे,पवन नागपुर, दिलिप रामगुंडे,अनिकेत मुंगले,मिलिंद मुंगले,नागेश्वर नागपुरे,राकेश गौरकार, सोमेश्वर बोमेवार,अनिल खडसंग,ललित नैताम, पियुष कोच्चे,अतुल बेले, अक्षय ढोने व गणेश भक्तगण उपस्थीत होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved