Breaking News

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथील ध्यानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराचे समापन

जिल्हा प्रतिनिधी – जयेंद्र चव्हाण

भंडारा:-पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी( चिचाळ) येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ सेंटर धम्म वर्ग पवनी यांच्या विद्यमाने 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .त्या शिबिराचे समापन आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1 वाजता करण्यात आले या धम्म शिबिरात एकूण 50 प्रशिक्षणार्थी यांनी भाग घेतला होता.

धम्मचारींनी कमलश्री बोरधरण ,धम्मचारीनी ज्योतीप्रभा, धम्मचारींनी आर्यपदमा ,धम्मचारी विमलरत्न नागपूर ,धम्मचारी पदमसुर नागपूर, धम्मचारी विमलरत्न यांनी मार्गदर्शन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धम्मात आहे .माझे गुरु बुद्धाच्या शिकवणीतून हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केले आहे. बौद्ध धम्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला धम्म आहे. रोज निदानानंतर दिलेला औषध आहे. या निवासी धम्म ज्ञान शिबिरात राहण्याची ,जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या संपूर्ण शिबिरामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 ला पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी शांतीवन बुद्ध विहाराला भेट दिली असता त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी धम्म साधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved