अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर धडकला मोर्चा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा निकाल दिल्याने शिवसैनिकानमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि आक्रोषाचे रूपांतर मोर्चात झाले. आज दिनांक १२ जाणेवारी रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात. महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर. युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर. विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे. संघटक भाऊराव डांगे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीहरी बालाजी देवस्थान येथून राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय जाहीर केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय समोर राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला बेश्रमच्या फुलाचा हार टाकून. प्रतिमा जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर. उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी मोर्चाला संबोधित केले. तर आभार प्रदर्शन तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केले.यावेळी तानाजी सहारे. शहर प्रमुख नितीन लोणारे. सुनिल हिंगणकर.वरोरा महिला आघाडी तालुका प्रमुख सरला मालोकर. वरोरा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे. किशोर उकुंडे. राजेंद्र जाधव. विनायक मुंगले. चिमूर तालुका अधिकारी शार्दुल पचारे. सहित शेकडो शिवसैनिक उपस्थित होते