Breaking News

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रोटरी क्लबचा ‘सायकल बँक’ अनोखा उपक्रम

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- रोटरी क्लब शेवगावच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थिनींना जिजाऊ जयंती निमित्त सायकल बँक उपक्रमांतर्गत मोफत 14 सायकलींचे वाटप करण्यात आले.शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेमधील गरजू विद्यार्थिनींची यासाठी निवड करण्यात आली होती.हरिभाऊ बोडखे, सौ . कमल बोडखे यांच्या वतीने कै.डॉक्टर हंसराज बोडखे यांच्या स्मरणार्थ पाच सायकलींचे वाटप करण्यात आले, तर प्रांजल फाउंडेशन च्या वतीने प्रशांत देवणे यांच्याकडून पाच सायकली वितरित करण्यात आल्या. उज्वल धूत , मंगल गोरे,शुभांगी बढे, मनिषा दहातोंडे, यांनी प्रत्येकी एक सायकलचे वाटप केले.

माजी प्राचार्य रमेश भारदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले ,रोटरी क्लबच्या समन्वयातून आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजू मुला-मुलींसाठी राबवलेला सायकल बँक हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे. ज्यांना आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये अशी बहुमोल मदत मिळाली त्यांनी आपले जीवनध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून त्याचे चीज करावे.यावेळी रोटरीयन हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, खजिनदार सुधाकर जावळे, रोटरीयन श्रीमती लबडे, डॉ .पुरुषोत्तम बिहाणी, डॉ.आशिष लाहोटी, डॉ मयूर लांडे, मोहम्मद वसीम ,युसुफभाई पठाण ,काकासाहेब लांडे, भागनाथ काटे, संतोष ढाकणे,बाळासाहेब चौधरी, वल्लभशेठ लोहिया, आदी. उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष मनेश बाहेती यांनी प्रास्ताविक केले ,सचिव प्रदीप बोरुडे यांनी आभार मानले.

*ताजा कलम*

राजमाता जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन “जे का रंजले जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ” या उक्ती प्रमाणे गरीब कुटुंबातील मुलींना त्यांची गरज ओळखून मदत करण्याचा पायांना या सामाजिक संस्थांनी घातला आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved