भुमिपुत्राच्या हस्ते होणार उद्घाटण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मौजा कोलारा तु येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर आणि ग्राम पंचायत कोलारा तु यांच्या सयुक्त विद्यमानाने ‘ ग्रामविकास व मतदार जनजागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दि 24 ते 30 जानेवारी पासुन कोलारा जिल्हा परिषद प्राथ शाळेच्या भव्य आवारात आयोजीत करण्यात आला आहे.राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच उद्घाटण मौजा कोलारा (तु)चे भुमिपुत्र तथा उपायुक्त दशरथ कुळमेथे आदिवासी विकास विभाग नागपूर याच्या शुभहस्ते होणार आहे तर अध्यक्ष डॉ. केदारसिह रोटेले ,घाडगे उपविभागीय अधिकारी ,डॉ.श्याम खंडारे,मनोज गभने पोलीस निरीक्षक ,साईतन्मय डुबे वनपरिक्षेत्र अधिकारी , किरणताई रोटेले ,अमोलसिह रोटेले, प्राचार्य लुगे,काजोल रोटेले, शोभा कोचचाडे , सचिन डाहूले, यासह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना शिबीर दि 24 जाने ते 30 जाने पर्यत सामुदायिक ध्यान / रामधुन /प्रार्थना / प्राणायाम / रत्तदान शिबीर दैनदिनी विविध विषयावर वन उपजानापासुन उद्योगाची निर्मीती , पुरुक पोषन आहार , परिसर स्वच्छ ,ग्रामीण जिवनात ग्रथालयाचे महत्व, मानव व वन्यजिव व्यवस्थापन ,शेतीसाठी जोड व्यवसाय मधुमाशी पालन , पशुची आरोग्य तपासनी,आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाची सधी,माती परीक्षण व कृषी विभागाच्या योजना आदि विषयावर मार्गदर्शन होणार आहेत डॉ. अजय पिसे ,योगीता मडावी वनपरिक्षेत्र अधिकारी, डॉ किलनाके, लाटकर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,पूनम गेडाम बालविकास प्रकल्प अधिकारी,डुले ‘हभप अशोक चरडे ,रमेश चौधरी,डॉ.सुनिल झाडे,राजु देवतळे यासह अनेक मान्यवरांच मार्गदर्शन होणार आहे तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उपस्थिती रहावे असे आवाहन डॉ.खंगार ,डॉ.कुमरे,डॉ.मिलमिले,सरपंच शोभा कोयचाडे ,गणेश येरमे यानी केले.