तात्काळ पुलाचे बांधकाम न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या साठगाव ते हिवरा रोडवरील तात्पुरता पूल पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पूल वाहून गेल्याने बऱ्याच गावातील लोकांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर आणखी एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साठगाव वरून हिवरा, वाकर्ला, बोरगाव, मेढा, नक्षी मार्गे भिवापूर जाणारा हा मार्ग असून या मार्गाने दैनंदिन वर्दळ असते. १९ जुलै २०२४ च्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच पावसाने पुल वाहुन गेल्याने शालेय विद्यार्थ्यांचा मार्ग बंद झालेला आहे. दोन वर्षापासून हा पूल जीर्ण अवस्थेत असल्याने या पुलाचे बांधकाम आधी होणे फार गरजेचे होते.
परंतु बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. तात्पुरता पूल पावसाळ्याच्या दिवसात वाहून गेल्याने याला जबाबदार कोण? तसेच पावसाळा सुरू असताना तात्काळ या पुलाचे बांधकाम होणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहे. पूल वाहून गेल्याची माहिती साठगाव येथे जाऊन आंबोली ग्रा. प. सदस्य व वंचित युवा जिल्हाध्यक्ष शुभम मडपें.नागरिकांसह घटनास्थळी पुलावर जाऊन पाहणी केली.
याची माहिती संबंधित विभागाला देऊन या पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी केली. व SDM साहेब चिमुर व तहसीलदार साहेब चिमुर यांच्याशि फोनद्वारे बोलणे करून तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले.व तसेच PWD कार्यालय चिमुर येथील उपगंडतवार सरांनी 3 दिवसात काम करू अशे आश्वासन दिले.आणि या पुला चे बांधकाम विधानसभा निवडणुकीच्या आत न केल्यास कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मत मागायला गावात येऊ देणार नाही, असा इशारा व साठगाव हिवरा येथील नागरिकांनी दिला आहे.