Breaking News

अल्पवयीन बालकावर अतीप्रसंग करणाऱ्या आरोपीस 20 वर्षाचा कारावास – अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दिनांक 25/04/2017 रोजी (आरोपी) सचिन पांडुरंग मेहरकुरे याने अकरा वर्षीय अल्पवयीन बालकावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती, त्याची तक्रार पो.स्टे.चिमूर येथे दिनांक 26/04/2017 रोजी अप क्रं.214/2017 कलम 377,504,506 सहकलम 6,8,10 पोस्को अधिनियमा नुसार गुन्हा नोंद  करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व पो.उपनिरीक्षक मनोज नाले यांनी आरोपी विरुध्द पुरावे गोळा करून सदर गुन्हयाची कागदपत्रे न्यायदानासाठी अतिरीक्त सत्र न्यायालय वरोरा येथे दाखल केले होते.

आज दिनांक 18/07/2024 रोजी अतिरीक्त सत्र न्यायालय वरोरा यांनी केसचा निकाल देताना आरोपी विरूध्द सबळ पुरावे पाहुन आरोपी नामे सचिन पांडुरंग मेहरकुरे यास कलम 235(2) CRPC प्रमाणे 20 वर्षे कारावासाची शिक्षा तसेच 5,000/- रूपये दंडाची शिक्षा दिलेली आहे. तरी यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पो.उपनिरीक्षक मनोज नाले यांनी तपासी अधिकारी, कोर्ट पैरवी म्हणुन पोलीस अंमलदार अवधुत खोब्रागडे तसेच सरकारी अभियोक्ता गोविंदा उराडे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडुन सदर गुन्हयामध्ये ‍पिडीत अल्पवयीन बालकास न्याय मिळुन देणे करीता महत्वाची भुमिका बजावली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved