Breaking News

मच्छीमार, मत्स्यव्यवसायीकांनी विविध मागण्यांसंदर्भात घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट

“जि.प.शाळेला साउंड सर्व्हिस सेट भेट”

“गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर :- चिमूर तालुक्यातील आंबोली व भिसी जिप क्षेत्रातील अनेक गरजू महिलांनी घरीच कपडे शिवून घरात हातभार लागेल या उद्देशाने मागणी केली असता आमदार बंटी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन भेट देण्यात आली.

“मच्छीमार, मत्स्यव्यवसायीकांनी विविध मागण्यांसंदर्भात घेतली आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट”

चिमूर तालुक्यातील एकूण १४ मच्छीमार/मत्स्यव्यवसायीक सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात आज दिनांक ३० जुलै रोजी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची चिमूर येथील निवासस्थानी भेट घेतली. या विषयावर मत्स्यव्यवसायीकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार भागडीया यांनी निवेदन स्वीकारून सविस्तर चर्चा केली व सर्वांना आश्वस्त केले.

यावेळी चिमूर तालुक्यातील जनसेवा मच्छीमार सहकारी संस्था मर्यादीत सिरपूर, मोटेगाव मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित मोटेगाव, आदर्श मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित पेंढरी, श्रीराम मच्छीपालन सहकारी संस्था मर्यादित पळसगाव (भडक), कोळी मत्स्य‌पालन सहकारी संस्था मर्यादीत शंकरपूर, श्रीराम बहुउद्देशीय मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादीत विहीरगाव, मच्छींद्र मच्छीपालन सहकारी संस्था मर्यादीत नवतळा, विकास मत्स्यव्यवसायीक सहकारी संस्था मर्यादीत काजळसर, भोलेनाथ भोई समाज सहकारी संस्था मर्यादित बरडघाट, वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादीत तळोधी (नाईक), मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्था मर्यादीत पिपर्डा, मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित भिसी, वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्था मर्यादीत चिमूर, नवजीवन मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादीत मिनझरी – या सर्व संस्थांचे अध्यक्ष, सचिव, अन्य पदाधिकारी आणि भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

“आमदार बंटी भांगडिया यांचे कडून साउंड सर्व्हिस सेट भेट”

खापरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांकरीता शाळेमध्ये होणारे संस्कृतीक कार्यक्रम , नाट्य संमेलन इतर खेळ यासाठी सांऊड सव्हिर्स ची आवश्यकता असल्यामुळे राजु पाटील झाडे यांच्या माध्यमातून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना कळविण्यात आली.

आज दि. 30/07/24 ला शिक्षण परिषद कार्यक्रम चे औचित्य साधून भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे यांचे द्वारे आमदार बंटी भांगडीया यांनी खापरी येथे शाळेत साउंड सर्व्हिस सेट भेट दिली. यावेळी जि.प.शाळेचे मुख्याधिपका सौ. मालु पिसे व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी आमदार बंटी भांगडीया यांचे आभार व्यक्त केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved