Breaking News

BCI व AFPRO जणजागृती प्रकल्पांतर्गत कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान

गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कामगंध सापळयाचा प्रभावी वापर करावा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ 

राळेगाव :- दिनाक 26/08/2024- यवतमाळ- अफ्प्रो आणि BCI यांच्या संयुक्त विद्यामाने यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामध्ये “कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान” 26ते 29 आगस्त दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये कपाशी वरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे कसे प्रभावी ठरू शकते व शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्प अंतर्गत नोंदीणीकृत शेतकरी बांधवाना कामगंध सापळे वाटप करण्यात @आला आहे.कापूस पिक हे सध्या ५० ते ६० दिवसाचे झाले असुन बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोंबकळयाच्या स्वरूपात ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापासुनच दिसुन येत आहे. कपाशी जेथे फुलावस्थेत आहे अश्या ठिकाणी डोमकळया आढळून आल्या आहेत. बोंड अळीचा प्रादुर्भाव ५ ते ७ टक्केच्यावर आढळून आला आहे. सतत चे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते.

गुलाबी बोंडअळी किडीच्या व्यवस्थापनामध्ये उशिर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढण्याची शक्यता असते म्हणुन सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन करून हया किडीमुळे होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते.त्यासाठी खालील उपाययोजनेचा अवलंब करावा.पिकातील डोमकळया नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांची रोकथाम करता येईल.डोमकळी दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅॉडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिली किंवा १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० ली पाणी या प्रमाणे फवारणी डोमकळीतील गुलाबी बॉड अळी कामगंध सापळयाचा वापर करावा. पिकाच्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फुट अंतर ठेवावे जेणेकरून कामगंध सापळयाच्या प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावे.सतत तीन दिवस या सापळयामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.

गावनिहाय कार्यक्रम खालील प्रमाणे असून आपल्या वेळेनुसार आपणास उपरोक्त “कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियत्रनाबाबत जागरूकता अभियान’ कार्यक्रमामध्ये उपस्थित होते, 26/08/2024 च्या शेतकरी मेळावा कार्यक्रमाला मार्गदर्शक Afpro चे प्रकल्प व्यवस्थापक सचिन मातले सर, यवतमाळ नंदकिशोर डेहनकर सर pu-05 मॅनेजर राळेगांव व ज्ञानेश्वर बोरकर सर pu-02 मॅनेजर नेर व प्रमुख पाहुणे वाढोनाबाजार चे सरपंच, माजी सरपंच, सदस्यवर्ग व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते,कार्यक्रमाला BCI चे सर्व LG शेतकरी उपस्थित होते व pu-05 चे सर्व कृषिमित्र त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved