Breaking News

मास्क न लावणा-या २२० नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १०३२५ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर, ता.६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (६ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०३२५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३५,२१,५००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४८, धरमपेठ झोन अंतर्गत ३७, हनुमाननगर झोन अंतर्गत १७, धंतोली झोन अंतर्गत १४, नेहरुनगर झोन अंतर्गत ८, गांधीबाग झोन अंतर्गत १९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १४, लकडगंज झोन अंतर्गत १४, आशीनगर झोन अंतर्गत २१, मंगळवारी झोन अंतर्गत २७ आणि मनपा मुख्यालयात १ जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ४८५५ बेजबाबदार नागरिकांकडून रु २४ लक्ष २७ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.

आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १४१६, धरमपेठ झोन अंतर्गत १८८२, हनुमाननगर झोन अंतर्गत ९६४, धंतोली झोन अंतर्गत ९९४, नेहरुनगर झोन अंतर्गत ५८२, गांधीबाग झोन अंतर्गत ६७३, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ६९८, लकडगंज झोन अंतर्गत ६१५, आशीनगर झोन अंतर्गत १११९, मंगळवारी झोन अंतर्गत १२९८ आणि मनपा मुख्यालयात ८४ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर …

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved