Breaking News

मास्क न लावणा-या २७६ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११९१२ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर, ता.१३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (१३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २७६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११९१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ४३,१५,०००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५२, धरमपेठ झोन अंतर्गत ८२, हनुमाननगर झोन अंतर्गत २८, धंतोली झोन अंतर्गत ११, नेहरुनगर झोन अंतर्गत १५, गांधीबाग झोन अंतर्गत १८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १७, लकडगंज झोन अंतर्गत १३, आशीनगर झोन अंतर्गत १८, मंगळवारी झोन अंतर्गत १९ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ६४४२ बेजबाबदार नागरिकांकडून रु ३२ लक्ष २१ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved