
नागपूर, दि. 28: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे उद्या गुरूवार, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी नागपूर विमानतळावर सकाळी अकराला आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाचला अमरावतीकडे प्रयाण करतील.
30 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातला अमरावती येथून नागपूर येथे आगमन. शनिवार, दिनांक 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ येथे उच्च न्यायालयाच्या कार्यकारी परिषद इमारत समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी चारला नागपूर येथून दिल्लीकडे विमानाने प्रयाण करतील.