Breaking News

पोलीस स्टेशनला येऊन कागदपत्र दाखवा आणि वाहने घेऊन जा – पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव

उपविभागीय अधिकारी यांनी जाहीरनामा केला प्रसिद्ध

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-राळेगाव येथील पोलीस स्टेशनला जमा असलेल्या वाहनांचा लिलाव अजून पर्यंत झालेला नाही त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये आवारात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चार चाकी वाहन क्षतीग्रस्त अवस्थेत पडल्यासारखे आहे तेंव्हा वाहन मालकांनी आपल्या वाहनाची कागद पत्रे दाखवून वाहन घेऊन जावे. असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या पंधरा-विस वर्षापासून राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अपघातातील, चोरी गेलेले बेवारस सापडलेल्या वाहनांचा पोलीस स्टेशन ने उपविभाग अधिकारी राळेगांव यांचेकडे पडून असलेल्या जीर्ण वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी परवानगी मागितली होती.

त्यानुसार लिलाव झालेला नाही त्यामुळे पोलीस स्टेशन आवाराचा आजूबाजूचा परिसर चारचाकी, मोटरसायकल, मोपेड वाहनांनी भरलेला आहे. यासंदर्शन प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. सुनिल चव्हाण यांनी आदेश काढून जाहीरनामा काढला आहे कोणत्याही गुन्ह्यात नसलेले, बेवारस पडून असतांना राळेगाव पोलीस स्टेशनला जमा असलेल्या वाहनांचा मालकी हक्क असल्यास त्या वाहनांची कागद पत्रे दाखवून राळेगाव पोलीस स्टेशन ठाणेदाराशी संपर्क करावा व १५ दिवसाचे आत पोलीस स्टेशनला असलेल्या वाहनांची मालकी सिद्ध न केल्यास सदर वाहनांची लिलावाद्वारे बोली बोलून विक्री करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी राळेगांव यांनी जाहीर नामा प्रसिद्ध करून कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved