Breaking News

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य समीक्षा या उपक्रमांतर्गत ख्यातनाम कवी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नागपुर: अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत शाखेने आता साहित्य समीक्षा हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमात आता विविध साहित्यिकांच्या साहित्यावर समीक्षात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता डाॅ हेडगेवार रक्तपेढीचे सभागृह, धरमपेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ख्यातनाम कवी डॉ .उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील डॉ. कोठेकर यांच्या दिक्कालाच्या मांडवात, काठावर दूर नदीच्या, आणि अजून काही या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक भाषणे होणार आहेत. या कार्यक्रमात सन्माननीय वक्ते म्हणून डॉ. गणेश चव्हाण, डॉ.अमृता इंदूरकर आणि प्रकाश एदलाबादकर हे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर वि. स. जोग हे राहणार आहेत .

या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष एड लखनसिंह कटरे,कार्याध्यक्ष अविनाश पाठक आणि महामंत्री एड.सचिन नारळे यांनी केले आहे .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved