Breaking News

खंडग्रासचंद्रग्रहण जे कोण ग्रहण पाळणार असतील तर ,त्यांच्या साठी ही माहिती.

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755

शेवगांव:-शनिवारी दि २८/१०/२३ रोजी उत्तर रात्री 01:00 ते 2:30 चंद्रग्रहण आहे.दु ०३:१४ पासून वेध सुरू होतात पण बाल,वृद्ध,अशक्त, आजारी,गरोदर स्त्रिया सर्वांनी शनिवारी सायं ०७:४१पासून वेध पाळावेत. म्हणजेच सायं ०७:४१ पर्यंत भोजन करावे.सायं ०७:४१ नन्तर जप,वाचन,नामस्मरण, दानधर्म,अवश्य करावे.- मुख्य ग्रहण काळ रात्री ०१ते ०२:२३ आहे- या काळात काहीही खाऊ नये, पाणी वगैरे पिऊ नये,झोपू नये, मलमूत्र विसर्जन करू नये.-रात्री०२:२३ नंतर स्नान करून मगच खावे.-
मिथुन,कर्क,वृश्चिक, कुंभ या राशीना शुभ फळ.
सिंह,तुळ,धनु,मीन या राशीना मिश्र फळ.
मेष,वृषभ, कन्या,मकर या राशीना अनिष्ट फळ
दु १२ पर्यंत सर्व खाद्यपदार्थ व पाण्यात तुळस ठेवावी,म्हणजे ग्रहण काळांनंतर ते वापरण्यास हरकत नाही.

*-चंद्रग्रहण व कोजागिरी-*

शनिवारी दि२८/१०/२३रोजी कोजागिरी पौर्णिमा असलेने नियमितपणे रात्री १२ वा. इंद्राचे व श्री लक्ष्मी विष्णु चे पूजन करता येईल दुधाचा नेवैद्य दाखवता येईल पण प्रसाद म्हणून एक पळीभर दूध प्राशन करता येईल, राहिलेले दूध दुसऱ्यादिवशी सकाळी प्यावे.

*ग्रहण दिसणारे प्रदेश*
संपूर्ण भारतासह
आशिया खंड, ऑस्ट्रेलिया ,रशिया ,युरोप, आफ्रिका खंड

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved