Breaking News

शेवगाव पाणी योजनेच्या बांधकामाच्या आड येतोय कोण तांत्रिक सल्लागार कंपनीची संशयास्पद भूमिका ???

शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या जल कुंभाच्या कामाची पाहणी करण्याकरता शेवगाव पाणी शहर कृती समितीचे अध्यक्ष फ्प्रेमसुख जाजू यांनी भेट देऊन जाणून घेतल्या समस्या

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:- शेवगाव शहर पाणी कृती समिती सोबतच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अहमदनगर  एस. के. सालीमठ यांच्या तोंडी व लेखी आदेशाने अडथळ्यांची शर्यत पार करत इंद्रायणी कन्स्ट्रक्शन कंपनी ने जल कुंभाच्या कामाला सुरुवात केली परंतु “नमनाला घडाभर तेल” या वृत्ती प्रमाणे गेले 30 दिवसापासून संबंधित जल कुंभाचे काम तांत्रिक सल्लागार समितीच्या परवानगी अभावी बंद पडले असून त्याची पाहनी करण्याकरिता काल दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी शेवगाव शहर पाणी कृती समितीचे अध्यक्ष श्री प्रेमसुख जाजू सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांनी प्रत्यक्ष गणपती मंदिर कोरडे वस्ती येथे जाऊन रखडलेल्या कामाची पाहणी केली असता गेल्या तीन-चार आठवड्यापासून जल कुंभाचे काम बंद अवस्थेत आहे याला जबाबदार कोण ???याची विचारणा केली असता  संबंधित ठेकेदार कंपनी तांत्रिक सल्लागार कंपनी व नगर परिषदेचे पाणीपुरवठ्याचे इंजिनियर एकमेकांकडे बोट करताना दिसत आहेत.

वास्तविक पाहता पाथर्डी शहराची पाणीपुरवठा योजना आणि शेवगाव शहराची पाणीपुरवठा योजना एकाच वेळी मंजूर होऊन कार्यारंभ आदेश मार्च 2023 मध्ये मिळाले होते पाथर्डी शहर पाणी योजनेचे काम सुमारे 40 टक्के पूर्ण झाले असून शेवगावच्या पाणीपुरवठा योजनेच्या एक टक्का सुद्धा काम आज पर्यंत झालेले नाही या संदर्भात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या अभियंता श्रीमती पूर्वा माळी तांत्रिक असाल्लागार कंपनीचे मानव कन्स्ट्रक्शन धुळे यांचे श्री सनेर व इंद्रायणी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुनील कुमार नागरगोजे यांच्याशी संपर्क केला असता कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या काम रेंगाळल्यामध्ये आमची कुठलीही चूक नाही असं सांगतात या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याशी शेवगाव शहर पाणी कृती समिती चर्चा करणार असून योजना रखडवण्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे प्रेम सुख जाजू यांनी सांगितले याबाबत शेवगाव नगरपरिषद कार्यालयात चौकशी केली असता  सध्या पालिकेचे मुख्याधिकारी सचिन राऊत बदलून गेलेले आहेत नवनियुक्त मुख्याधिकारी नवले अजून हजर झालेले नाहीत जे अधिकारी आणि कर्मचारी पाणीपुरवठा योजनेकडे आहेत ते कायम रजेवर असतात नगरपरिषदेचा सर्व कारभार रामभरोसे आहे.

*ताजा कलम*

*विशेष बाब इंद्रायणी कन्स्ट्रक्शन कंपनीने आज पर्यंत शेवगाव शहरामध्ये प्रशासकीय कार्यालय सुद्धा सुरू केले नाही गेले एक वर्षात त्यांची कामातील प्रगती पाहता *ही योजना इथे दहा वर्षात पूर्ण होते की नाही असा प्रश्न सर्वसामान्य शेवगाव करांना पडला आहे ही पाणी योजना म्हणजे “जखम मांडीला आणि मलम शेंडीला’ असा कारभार सुरू असून योजना रखडण्याला कारणीभूत कोण??? असा सवाल सर्वसामान्य शेवगावकर विचारत आहेत*

*क्रमशः*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved