Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नागपूर व चंद्रपूर दौरा

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर, दि. ११ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवार दि. १२ मार्च रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता मोरवा विमानतळ हेलिपॅड चंद्रपूर येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६ वाजता मोटारीने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन चंद्रपूरकडे प्रयाण.

सायंकाळी ६.१५ वाजता बॉटनिकल गार्डनची पाहणी व फिरते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन. रात्री ८ वाजता मोटारीने कोतवाली वॉर्ड चंद्रपूरकडे प्रयाण. रात्री ८.०५ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांचे निवासस्थानी भेट. रात्री ८.१५ वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved