Breaking News

एल.सी.बी.ची दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

गुंड पिन्या कापसे टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-पिन्या कापसे टोळीतील दोघे जेरबंद शेवगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पिन्या कापसे याचे दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे (वय ३७, रा. भगतसिंग चौक, शेवगांव,जि. अहमदनगर), आबासाहेब नवनाथ कातकडे (वय ३६, रा.ठाकुर निमगांव, ता. शेवगांव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पो.कों. मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे,जालींदर माने, चा.पो.कॉ. अरुण मोरे आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ३ मार्च २०२४ रोजी फिर्यादी राजेश गणेश राठोड (वय २८, रा. बजरंगनगर, पो. वान्सी, ता. पुसद, जि. यवतमाळ) तसेच त्याचे इतर ४ साथीदार यांनी मागील भांडणाच्या कारणा वरुन पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे (रा. आंतरवली, ता. शेवगांव) याच्यावर पिस्टलमधून फायर केला. परंतु त्यास गोळी लागली नाही. त्यावेळी पिन्या कापसे याने त्याचे ७ ते ८ साथीदारांसह फिर्यादी व साक्षीदार यांचा स्कॉर्पीओ गाडीने पाठलाग करुन त्यांना लाकडी लांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती.गुन्ह्यामध्ये जखमी अर्जुन पवार हा औषधोपचारा दरम्यान मयत झालेला आहे. घटनेबाबत शेवगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याबाबत एस.पी. राकेशओला यांनी एल.सी.बी.चे पो. नि.दिनेश आहेर यांना आदेश दिले होते.

त्यानुसार एलसीबीचे पथक दि.९ मार्च २०२४ रोजी शेवगाव या ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती काढत असतांना पोनि. आहेर यांना गुन्ह्यातील आरोपी नितीन पन्हाळे व आबासाहेब कातकडे (दोन्ही रा.शेवगांव) हे शेवगाव या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळाली. ती माहिती त्यांनी तात्काळ पथकालादिल्याने त्यांनी शेवगांव या ठिकाणी आरोपीची माहिती घेत असतांना दोघे शिवाजी चौक (शेवगांव) येथे मिळून आल्याने त्यांनाताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे, आबासाहेब नवनाथ कातकडे असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितल्यानेत्यास पुढील तपासकामी शेवगांव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास शेवगाव पोलिस करत आहेत.

*ताजा कलम*

*यातील आरोपी नितीन पन्हाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात घरफोडीसह अन्य विविध प्रकारचे ६ गुन्हे दाखल आहेत. अशा लोकांना पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी तडीपार का करू नये ??? किंवा नको का का लावू नये अशी चर्चा शहरासह तालुक्यात सुरू आहे*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved