Breaking News

व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस

साप्ताहिक विभागाची निवडणूक होणार 28 जुलैला

चार उमेदवार निवडणूक रिंगणात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक (विंग) विभागाची, प्रदेश अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक चौरंगी होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. २८ जुलैला होणाऱ्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.जगातील ४३ देशांमध्ये आणि देशातील क्रमांक एकची व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,
प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी ही निवड निवडणुकीच्या माध्यमातून होईल असे जाहीर केले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

ही निवडणूक २८ जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये होत आहे. या निवडणुकीसाठी साप्ताहिक विंगचे राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणीचे सर्व सदस्य, निमंत्रीत सदस्य, टस्ट्री, राज्य पदाधिकारी असे आठशे जण मतदार आहेत. मतदान २८ जुलै रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये पार पडल्यानंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी वामन पाठक (लातूर), रोहित जाधव (सांगली) अब्दुल कयूम (छत्रपती संभाजी नगर), विकास बागडी (जालना) यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. ही निवडणूक चौरंगी होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. अन्य पदासाठीही निवडणूक आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानासाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना सर्वात मोठी संघटना झाली आहे. त्यामुळे संघटनेमध्ये होणारे सर्व उपक्रम हे वेगळे आणि एक पथदर्शी ठरणारे होत आहेत. साप्ताहिक विंगसाठी ही होणारी निवडणूक संघटनेच्या इतर विंगसाठी पथदर्शी आणि मार्गदर्शक अशी ठरणारी आहे. व्हॉईस ऑफ मीडिया ही एक वेगळेपण जपणारी पत्रकारांची संघटना असे मत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केले आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने
व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगसाठी होणारी निवडणूक होत आहे. यामध्ये सर्व मतदारांनी आपला शंभर टक्के निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवून मतदान करावे. असे मत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. संजीवकुमार कलकोरी यांनी व्यक्त केले,साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी होणारी ही पहिली निवडणूक आहे.ती अत्यंत चुरशीची होत आहे. त्यामुळे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन एक उपक्रम ठरेल असा विश्वास प्रदेश कार्याध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी योगेंद्र दोरकर यांनी व्यक्त केला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved