Breaking News

अतिवृष्टीमुळे भगदाड पडलेल्या धोकादायक रस्त्याची दखल घेत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी अधिकाऱ्यांना दुरुस्ती करीता दिले आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाने भगदाड पडलेल्या नवतळा पिंपळगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती केली

चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते यांच्यासह अनेक युवकांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नवतळा ते पिंपळगाव रस्त्यावर मोठे मोठे भगदाड पडले असून या मार्गावरून रहदारी करण्यास धोका निर्माण झाला होता तसेच अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या रस्त्याची माहिती भाजपा अनुसुचित जाती आघाडी चे तालुका उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना दिली असता,

अशा गंभीर बाबीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिली व तात्काळ रस्त्याची पाहणी करून पडलेले भगदाड बुजवून मार्ग तयार करण्यास सांगितले. आज दिनांक 31 जुलैला तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याला पडलेले भगदाड बुजविले व रहदारीस मार्ग मोकळा केला.

*चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते यांच्यासह अनेक युवकांचा भाजपात प्रवेश*

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथील निवासस्थानी झालेला बैठकीत चिमूर शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून चिमूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकुन पक्षप्रवेश केला.

तसेच चिमूर शहरातील नेहरू वार्ड, गुरुदेव वार्ड व ठक्कर वार्ड येथील अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेत आम्ही आमदार भांगडीया त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहुन असे आश्वासन दिले व पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

चिमूर शहरातील युवा कार्यकर्ते – अतुल खुळसंगे, मारोती उईके, गणेश दिघोरे, चेतन बघेल, संकेत बघेल, महेश नैताम, कुणाल बघेल, मयूर मानकर, तुषार इजमुलवार, हिमांशू मोहिनकर, निलेश मोहिनकर, नानु पचारे, महेंद्र मडावी, रोशन कामडी, विक्रम इजमुलवार, आशिष बघेल, शुभम जुमडे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved