Breaking News

तब्बल दोन दिवसानंतर सापडला युवकांचा मृतदेह

प्रतिनिधी – कैलास राखडे

ब्रह्मपुरी :-तालुक्यातील रणमोचन येथील लंकेश दिघोरे वय (२२) या युवकाने ब्रह्मपुरी आरमोरी रोड वरील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास घडली असून सदर युवकांवर मोठ्या प्रमाणावर मानसिक तणावात असल्याचे बोलल्या जात आहे सदर युवकानी स्वतःची पल्सर मोटार सायकल वैनगंगा नदीवरील पूलावर आढळून आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र दोन दिवसानंतर त्याचा अखेर मृतदेह ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली गडचिरोली जिल्ह्यातील पोरला नदीपात्रामध्ये आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे,

प्राप्त माहिती अशी की सदर युवक गांगलवाडी टी पॉईंट जवळील पाचगाव जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर नोकरी करीत होता सदर व्यक्ती दोन ते तीन वाजेच्या आसपास घरून ड्युटीवर निघून गेला मात्र नेहमीच्या वेळेप्रमाणे घरी न परतल्याने कुटुंबातील लोकांनी लंकेशच्या मोबाईल फोन केला मात्र तो स्विच ऑफ दाखवत असल्याने घरच्यांची आणखी चिंता वाढली कालांतराने काही व्यक्तींना त्याची पल्सर नावाची मोटार सायकल वैनगंगा नदी पुलावर असल्याचे सांगितले लगेचच घरच्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ती त्याचीच मोटरसायकल असल्याचे लक्षात आले त्यानंतर ब्रह्मपुरी ठाण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रार करण्यात आली व दोन दिवसापासून घरच्यांनी शोध घेतली असता,

सदर व्यक्तीचा मृतदेह तब्बल दोन दिवसानंतर ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडे सावली व गडचिरोली जिल्ह्यातील पोरला नदीपात्रामध्ये आढळून आला आहे त्याच्या पश्चात पत्नी 2 महिन्याचे बाळ आई असा परिवार आहे कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आत्महत्येच नेमके कारण कळू शकले नाही

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved