
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :-जानेवारी २०२१ मध्ये भिसी ग्राम प़चायतीच्या निवडणूकीमध्ये ६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते.परंतू भिसी नगरपंचायत होणार असे प्रशासकीय पातळीवर हलचली सुरू झाल्या.भिसी नगरपंचायत लवकरच होणार अशा दिव्यस्वप्नात असतांना ६६ पैकी ६५ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.परंतू एका उमेदवाराने आपले नामांकन अर्ज कायम ठेवले. मागील एक वर्षापासून ना, ग्रामपंचायत ना, नगरपंचायत अशा द्विधामनस्थितीत असतांना किमान १० महीण्यापासुन भिसी ग्राम पंचायतवर प्रशासकाचा एकहाती कारभार होता.
आता भिसी ग्राम पंचायत ची १६ जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय सरिपाटावर आप- आपले मोहरे भिसी ग्राम पंचायतच्या निवडणूकी मैदानात उतरविण्याचा राजकीय धुरंधरांनी बेत केलेला दिसुन येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत भिसी ग्राम पंचायत ची पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यत: असल्याने राजकीय गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.कारण जानेवारी २०२१ ला भिसी ग्राम पंचायतच्या निवडणूकीवर सर्वपक्षिय गटाच्या आणि स्वतंत्र उमेदवारांनी एकमुखी निर्णयाने नामांकन अर्ज मागे घेतले. परंतू आजस्थितीत प्रशासणाच्या दिरंगाईमुळे भिसी नगरपंचायत अस्तित्वात आली नाही.त्यामुळे भिसी ग्राम पंचायत च्या निवडणूकीला आता सामोरे जावे लागेल.
भिसीवांसियांना नगरपंचायतीचे दिव्यास्वप्नच ठरले. भिसी नगर पंचायत होणार , नगर पंचायत निर्माण झाल्यानंतर गावाचा सर्वांगीण विकास होणार,
गावविकासासोबत गावातील नागरीकांचे जिवनमान उंचावेल , अतिरिक्त विकास निधिने गांव लखलखाट होईल या अभिलालसेने भिसीतील सर्वदलिय उमेदवारांनी एकोप्याने येवून उमेदवारी अर्ज मागे घेतले . भिसी नगरपंचायत आज होणार उद्या होणार याच प्रतिक्षेत एक वर्षाचा कालावधी उलटून गेला. परंतू भिसी नगरपंचायतचा मात्र आजपावेतो थांगपत्ता लागलेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाव्दारे जिल्ह्यातील ११३ रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.त्यामुळे १७ पैकी १६ जागा रिक्त असलेल्या भिसी ग्राम पंचायतची पोटनिवडणूक होणार असल्याने उमेदवारांची शोधमोहीम जोरात सुरू आहे.
उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळणार का?
भिसी नगरपंचायतीची २ री अधिसूचना लवकर काढण्यात यावी,यासाठी आम. किर्तिकुमार भांगडीया समर्थकांनी हायकोर्टात
( उच्च न्यायालयात ) धाव घेतली .हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना अचानक राज्यात पोटनिवडणूकीचा कार्यक्रम लागला त्यात भिसी ग्राम पंचायत चा पोटनिवडणुकीत समावेश आहे.मात्र १६ जागेसाठी होणाय्रा पोटनिवडणुकीत सहभागी होण्यासाठी भिसीतील नागरीकांमध्ये पाहिजे तसा जोश दिसुन येत नाही.कारण नागरीकांमध्ये अशी चर्चा आहे,
कि स्थानिक नगरपंचायतीसाठी लढणारे कार्यकर्ते उच्च न्यायालयात धाव घेऊन भिसीची ग्राम पंचायत निवडणूक स्थगित करण्याचा आदेश उच्च न्यायालयातून आणण्याच्या तयारीत आहे. २३ नोव्हेंबरला भिसी नगर पंचायतीची सुनावणी होणार असल्याची चर्चा आहे.हा स्थगिती आदेश मिळतो कि, पोटनिवडणूक होते,हि बाब सद्यातरी गुलदस्त्यात आहे.