Breaking News

चिमूर शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 

अनेक युवकांनी केले रक्तदान

शहर कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- देशभरात कोरोना सारखा महाभयंकर व्हायरस आला आपण त्यावर कशीतरी मात केली परंतु आता मात्र दुसरा ओमायक्रॉन हा एक नवीन व्हायरस देशात आला आहे कोरोना व्हायरस आल्या नंतर बहुतांश नागरिक मृत्यू मुखी पडले,कुणाला दवाखान्यात जागा नाही,तर कुणाला रक्ताची गरज ,तर कुणी उपचार करण्यासाठी नेताना मृत पावले ,परंतु आता मात्र तशी परिस्थिती कुणावर येणार नाही व कुमाला रक्ताची कमी पडणार नाही हा दृष्टिकोन समोर ठेवून चिमूर शहर कांग्रेस कमिटी यांनी

आज दि.२५.१२२०२१ ला इंदिरा गांधी चौक चिमूर येथे रेनबो ब्लड अँड कंम्पोनंट बँक रामदास पेठ नागपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उदघाटन ७४.चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते पार पडले, तसेच रक्तदान करणाऱ्याना शहर कांग्रेसचे तर्फे बेग देण्यात आली या वेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,कांग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी तालुका अध्यक्ष माधवजी बिरजे,कांग्रेस जेष्ठ नेते धनराजजी मालके,शहर अध्यक्ष अविनाशभाऊ अगडे,

 

उपाध्यक्ष गुरुदास जुणघरे, मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख, तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर , माजी नगर सेवक नितीन कटारे , दीपक कुंभारे नागेंद्र चट्टे, सारंग बारापत्रे , रविंद्र अगडे दीपक अनिल राऊत शेडामे , उपाध्यक्ष राजूभाऊ चौधरी, माजी बांधकाम सभापती कदिरभाई शेख चाचा , ता.उपाध्यक्ष विनोद ढाकुनकर,डॉ.शिवरकर साहेब पोलीस निरीक्षक मनोज गभने साहेब,विनोद अड्याल साहेब, पप्पूभाई शेख,मंगेश घ्यार, तालुका महिला कांग्रेस अध्यक्षा सविताताई चौधरी, वनिताताई मंगरे,गीताताई रानडे,ममताताई भीमटे, दीक्षाताई भगत,शहणाज अंसारी इत्यादी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved