
३१ मे २०२२ पर्यंत धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यात उन्हाळी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील हे तालुके भात पिकासाठी प्रचलित असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी धान पिक लागवड करणार्याची संख्या अधिक प्रमाणात आहे. सदर उत्पादित धान शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेतात. शासनाकडून आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतकर्यांना प्रशासकीय समस्या व तांत्रिक समस्येचा सामना करावा लागल्यामुळे त्यांची आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणी झाली नाही.
नोंदणी अभावी शेतकरी आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान विक्रीपासून वंचित राहणार असल्यामुळे ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भूते, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांना प्रेषित निवेदनातून चिमूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांनी केली होती. चिमूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांनी सदर रास्त मागणी शासन दरबारी उचलून धरल्यामुळे त्याचाच परिपाक म्हणून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय, मुंबई चे सहसचिव सुधीर तुंगार यांनी पत्रक काढून रब्बी पणन हंगाम २०२१-२२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करीता ३१ मे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करण्याबाबत मुदतवाढ दिली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे नोंदणी अभावी आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान विक्री पासून कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही. त्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते, डॉ. रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी, रमाकांत अरगेलवार, माजी शहरप्रमुख शामराव भानारकर, मनोज लडके उपतालुका प्रमुख नागभीड, विक्की मडकाम माजी शहरप्रमुख, केवळराम पारधी उपतालुका प्रमुख, बालू सातपुते तालुका प्रमुख चिमूर, भाऊराव ठोंबरे विधानसभा समन्वयक, नाजीम शेख युवा सेना समन्वयक, बंडू पांडव उपतालुका प्रमुख, गणेश बागडे, मोरेश्वर अलोने विभागप्रमुख, रामचंद्र मैंद, राजेश दुपारे व गुलाब बागडे आदी. तथा ब्रम्हपुरी, नागभिड, चिमूर व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे._