
मजुराचा ४० फुटावरून खाली पडून मृत्यू
सुरक्षा साधने नसल्याने दुर्घटना,भरपाई ची मागणी
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
वाडी (प्र): एम.आय.डी.सी. येथील कंपनीत शेडचे टिन फिटींग करीत असताना मजुराचा ४० फुट उंचीवरून खाली पडून जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ व संताप निर्माण झाला आहे.
एम.आय.डी.सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडी आंबेडकर नगर,सम्राट अशोक चौक निवासी प्रभाकर सहदेवराव खांडेकर वय-५८ वर्षे हे नेहमी प्रमाणे आपले कंत्राटदार संतोष टेंभुर्णीकर रा.वाडी
यांच्या समवेत एम.आय.डि.सी.येथील काॅस्टवेल कंपनीत शेड फिटींग च्या काम करीत होते.
कंपनीत चाळीस फूट उंचावर काम करीत असतांना देखील नियमा प्रमाणे कंपनीतर्फे मजुरांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करण्यात आली नव्हती. उन्हाची वेळ असल्याने वरील टिन तापले होते.मृतक प्रभाकर काम करीत असताना अचानक टिना सह ४० फूट उंचावरून खाली कोसळला
डोक्याला व छातीला जबर मुका मार लागून तोंडातून रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला.
घाबरलेल्या अवस्थेत उपस्थित अन्य मजुरांनी तातडीने प्रभाकर ला डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रभाकर च्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यन्त नाजूक असून घरचा कमावता जीव निघून गेल्याने परिवार उघड्यावर पडले आहे . परिसरात ही घटना समजताच कम्पनी व ठेकेदारांच्या कार्यप्रणाली विराधात संताप निर्मान झाला. नातेवाईक व नागरिकांनी त्याच्या मृत्यूस कारणीभूत कंपनी मालकाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
एमआयडिसी परिसरातील अनेक कारखान्यात मोठ्या प्रमाणात मजुरांना उंचावरून काम करावे लागते परंतु कंपनी मालक अथवा कंत्राटदार कुठल्याही प्रकारचे सुरक्षा विषयक साधने नियमानुसार मजुरांना उपलब्ध करून देत नाहीत यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनेत वाढ झालेली दिसून येते.त्यामुळे शासन-प्रशासनाने या बाबीचे सर्वेक्षण करून दोषी कारखान्यावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी शवाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करीता नागपूर रुग्णालयात पाठविले.