चिमूर शहर कांग्रेसने नप मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजना चे पात्र लाभार्थ्यांना दि ८ जुलै २२पासून बांधकाम सुरू करण्याचे आदेश पत्र गाजावाजा करून दिले असले तरी मात्र घरकुल बांधकाम का सुरु झाले नाही? अशी शंका लाभार्थ्यांत व्यक्त केली जात असताना चिमूर कांग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना निवेदन देऊन मंजूर घरकुल बांधकाम ची चौकशी करून पात्र लाभार्थ्यांची बांधकामे सुरू करण्याची मागणी केली आहे.
चिमूर नगर परिषद व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त कार्यक्रमात पात्र घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम आदेश पत्र देण्याचा कार्यक्रम करून घेतला. परंतु अजून पर्यत घरकुल सुरू केले नसल्याने शंका व्यक्त केली जात असून कुचंबणा होत आहे. लाभार्थ्यांना घरकुल मिळाले काय?, निधी नप ला प्राप्त झाला काय?, किती काळात घरकुल बांधकाम करायचे आहे? आदेश पत्रात जाचक अटी असल्याने त्या पूर्ण करू शकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार पात्र लाभार्थ्यांना कागदपत्रे ची मागणी करीत असल्याने त्यांना त्रास होत आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम सुरू करण्याची मागणी चिमूर कांग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगडे, सोशल मीडिया प्रमुख पप्पू शेख, कांग्रेस तालुका अध्यक्ष संजय घुटके, विलास मोहिणकर, प्रदीप तळवेकर विजय डाबरे नागेश चट्टे ,योगेश अगडे, संदीप कावरे यांनी निवेदनातून मागणी केली.