केळापूर,( वर्धा) येथे रविवारी होणार अंत्यसंस्कार
नागपूर दिनांक ३० : आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त नागपुर चे माजी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे वडील हनुमंतराव महादेवराव ठाकरे वय 86 यांचे आज प्रदीर्घ आजाराने येथील सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानी आज निधन झाले.
हनुमंतराव ठाकरे हे 1995 मध्ये नागपूर येथून अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. पोलीस विभागात त्यांनी नागपूर वर्धा अमरावती व विदर्भाच्या विविध भागात काम केले आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदी चोरीच्या प्रकरणात त्यांनी यशस्वी कारवाई केली होती. पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यावर वर्धा जिल्ह्यातील त्यांच्या स्वाग्रमी वेळापूर येथे शेतीवर अत्याधुनिक शेतीचे विविध प्रयोग राबविले होते ते एक आदर्श शेतकरी म्हणूनही ओळखले जात होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या विचाराचा त्यांच्यावर पगडा असल्यामुळे आयुष्यभर त्यांनी निस्वार्थपणे जुनसेवा करण्याचे व्रत स्वीकारले होते. केलापुर येथे प्रजासत्ताक दिवस व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडावंदन करण्याची सुरुवात त्यांनी केली होती नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच सध्याचे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यावर सुद्धा वडिलांचा मोठा पगडा असल्यामुळे सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी ते कार्यरत आहेत .विदर्भात विशेषता आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदर डेरी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.त्यांच्या मागे तीन मुली रेखा बार हाते,रत्ना भांडे व रवींद्र ठाकरे हा मुलगा तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे…
केळापूर येथे उद्या अत्यसंस्कार
वर्धा जिल्ह्यातील त्यांच्या स्वग्रामी केळापूर येथे हनुमंतराव ठाकरे यांचेवर उद्या रविवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.